मुरूम (प्रतिनिधी);
बारामती तालुक्यातील मुरूम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तर्फे केंद्र सरकार व आयकर विभागाचा जाहीर निषेध करण्यात आला. मुरूम ग्रामस्थ व पंचक्रोशीतील कार्यकर्ते यांच्याकडून आयकर विभाग आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
आयकर विभागाच्या कारवाईनंतर अजित पवारांच्या समर्थनार्थ बारामतीत आयकर विभाग आणि केंद्र सरकारचा निषेध केला असून बारामतीच्या ग्रामीण भागात सुधा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केंद्र सरकार व आयकर विभागाचा निषेध नोंदवत आहेत.
अजित पवार यांच्याविरोधातील आयकर विभागाच्या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. आज बारामतीत देखील त्याचे पडसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बारामती तालुक्यातील मुरूम या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखली करण्यात आली. "अजितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है".... "हमारा नेता कैसा हो अजितदादा जैसा हो"... अजितदादा अजितदादा only अजितदादा .. अशी घोषणा बाजी करण्यात आली.
.
إرسال تعليق