सोमेश्वर नगर (प्रतिनिधी)
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामाच्या बिलाची कोंडी फोडली आहे. २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या ऊसाला प्रति टन ३१०० रुपये दर जाहीर केल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.यापूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासदांना २८०८ रुपये एफ आर पी अदा केली आहे.३१०० रुपये दर जाहीर केल्याने आता सभासदांना २९२ रुपये अधिकचे मिळणार आहेत.
إرسال تعليق