सुपे प्रतिनिधी /
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी सुपे (ता.बारामती) येथील प्रतिक जयराम सुपेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या हस्ते सुपेकर यांना पुण्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर,  प्रदेश उपाध्यक्ष व निरिक्षक सतीश दरेकर, कार्याध्यक्ष नितीन शेंडे, अतुल राऊत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे जिल्हा कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुपेकर कार्यरत आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सतीश दरेकर, जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करणार आहे.  पक्षाने माझ्यावर सोपवलेली सरचिटणीस पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून, माझ्या सर्व तरूण सहकाऱ्यांसह ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या संधीचे सोने करीन अशी प्रतिक्रिया सुपेकर यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post