वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी)
बारामती तालुक्यातील उंडवडी गावात शेतात खुरपणी साठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तीन अज्ञानाने हिसकावून पोबारा केला आहे. यासंदर्भात लक्ष्मी देविदास गवळी (वय 55, रा. उंडवडी) यांनी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून चोरटे पाटस टोल नाक्यावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.
सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी हे शनिवार दिनांक 31 जुलै रोजी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये उडीद पिकाची खुरपणी करीत असताना तीन अज्ञात युवक त्यांच्यापाशी आले व विळ्याचा धाक दाखवून गळ्यातील 22 हजार पाचशे रुपये किमतीचे मंगळसूत्र व पोत हिसकावून दुचाकीवर बसून निघून गेले. यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलिसांनी अज्ञात तीन इसमा विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर सलीम शेख हे करीत आहेत.
Post a Comment