माळेगावच्या तलाठी प्रमिला लोखंडे यांचा निरोप समारंभ संपन्न

बारामती (प्रतिनिधी)
कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास त्याचे श्रेय मिळते असे मत जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषदेचे सदस्य प्रमोद जाधव यांनी व्यक्त केले. माळेगावच्या तलाठी प्रमिला लोखंडे यांचा निरोप समारंभ व नूतन तलाठी अमोल मारग यांचा स्वागत समारंभ तलाठी कार्यालय माळेगाव बुद्रुक येथे संपन्न झाला. यावेळी जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रमिला लोखंडे यांनी माळेगाव परिसरात काम करत असताना त्यांनी पारदर्शक व प्रामाणिकपणे काम केले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना इत्यादी योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून त्यांनी जे कार्य केले त्यामुळे गावातील या कामाची आकडेवारी ९५% आलेली आहे. आणि त्याची पावती म्हणून आज त्यांची पदोन्नती झाली व तहसील कार्यालयात पुरवठा विभागाकडे अव्वल कारकून म्हणून त्यांचेकडे जबाबदारी येत आहे. हे अभिमानास्पद आहे. या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी माळेगाव येथील पत्रकार बांधवांच्या वतीनेही तलाठी प्रमिला लोखंडे, नूतन तलाठी अमोल मारग तसेच माळेगाव येथील तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या अतिरिक्त तलाठी गौरी शेळके यांचा सत्कार करण्यात आला. बंडूनाना पडर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी माळेगाव कारखान्याचे माजी संचालक अशोकराव सस्ते, शिरीष वाघमोडे, बंडूनाना पडर, उद्योजक निलेश बोबडे, पत्रकार प्रशांत धुमाळ, संग्राम पवार, संदिप आढाव, सोनाली शहा, ऋतुजा शहा, ममता खरात, सुनिल भोसले, शशिकांत देवकाते यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم