कोऱ्हाळे बुद्रुक (प्रतिनिधी) :
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथे नुकतेच एअरटेल टॉवर चे उद्घाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक सुनील तात्या भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक अनिल खलाटे, थोपटेवाडी गावचे उपसरपंच कल्याण गावडे, पत्रकार सचिन वाघ, रामदास गावडे, तात्या गुळूमकर, विशाल यादव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. थोपटेवाडी येथे एअरटेल टॉवर सुरू झाल्याने आता परिसरातील ग्राहकांना फुल स्पीड नेटवर्क मिळणार आहे. अशी माहिती एअरटेल कंपनीचे मुकेश कुमार परदेशी, संतोष हरिदासन, गणेश मदने,यांनी दिली. स्थानिक विक्रेते राकेश पवार, सहकारी प्रशांत गोरे,भूषण सोरटे, विशाल यादव यांनी यावेळी एअरटेल नेटवर्क चा लाभ घेण्याचे आवाहन केले.
31 ऑगस्ट पर्यंत एअरटेलची जम्बो ऑफर
परिसरातील नागरिकांना एअरटेल चे फुल स्पीड नेटवर्क मिळणार असल्याने एअरटेलने नवीन ग्राहकांसाठी एक ऑफर दिली आहे. जे ग्राहक 31 ऑगस्टपर्यंत अन्य कंपनीचे कार्ड एअरटेल मध्ये पोर्ट करतील त्यांना दोन महिन्यासाठीचा रिचार्ज फ्री देण्यात आला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल आणि अनलिमिटेड डाटा ग्राहकांना फ्री मिळणार आहे.
إرسال تعليق