वडगाव निंबाळकर (प्रतिनिधी)
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत  शासन आदेशाच पालन न करता आस्थापना सुरू ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 आस्थापना वर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई केली आहे. गायत्री किराणा स्टोअर्स (वानेवाडी), भोसले इंटरप्राईजेस (वानेवाडी), घोडके मटन शोप (करंजेपुल), हॉटेल तोरणा मिसळ (उंडवडी), हॉटेल गवळी चहा (उंडवडी), ही पाच दुकाने सात दिवसासाठी सील करण्यात आली आहेत.सदर कारवाई साठी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून पाच प्रस्ताव माननीय तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी बारामती यांच्याकडे सादर करण्यात आले होते.  माननीय तहसीलदार यांच्याकडून सदर आस्थापना बंद  करण्याबाबत आदेश झालेने ही पाच दुकाने वडगाव निंबाळकर पोलिसांनी सात दिवसासाठी सीलबंद केली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post