मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव वडगांव गटामध्ये येणाऱ्या १९ गावांत जाऊन कोव्हीड लसीकरण घेण्याची मागणी तालुका वैद्यकीय अधीकाऱ्यांकडे केली असल्याचे प्रतीपादन जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी केले . जिल्हापरीषद गटातील १९ गावात असणाऱ्या कोरोना रुग्णांची पाहणी व गावातील विकास कामांचा आज दि ९ रोजी त्यांनी आढावा घेतला .
मोरगाव जिल्हा परीषद गटातील मोरगाव , तरडोली , माळवाडी , आंबी , लोणी भापकर , मुर्टी , मोढवे , वडगाव निंबाळकर , जोगवडी आदी १९ गावात जाऊन कोरोना रुग्णांचा आढावा माजी जिल्हा परीषद अध्यक्ष्यांनी घेतला . यावेळी मोरगांव येथे सरपंच निलेश केदारी , ग्रामसेवक मोरेश्वर गाडे , गणेश कुंभार , तर तरडोली येथे सरपंच नवनाथ जगदाळे , उपसरपंच महेंद्र तांबे , ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी , पळशीचे दादा माने , वैभव मोरे , कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष खोमणे उपस्थित होते .
देवकाते यांनी वरील गावांत कोरोना रुग्णांची संख्या , उपाययोजना व विविध विकास कामांबाबत सरपंच , ग्रामस्थांशी चर्चा केली . मोरगांव - वडगाव गटातील कोरोनाचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी गटात येणाऱ्या प्रत्येक गावांत जाऊन लसीकरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले . याबाबत तालुका वैद्यकीय अधीकारी मनोज खोमणे यांकडे गावागावात जाऊन कोव्हीड लसीकरण घेण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले . तसेच मोरगाव येथील वैद्यकीय अधीकारी अनिल वाघमारे यांनाही याबाबत सुचना केल्या .
Post a Comment