कोराळे बुद्रुक 
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वसंत मोरे तर उपाध्यक्षपदी कल्याण पाचांगणे व युवराज खोमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर परिसरात आज पार पडली, मावळत्या कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारिणीची एक वर्षासाठी ची निवड पार पडली. यावेळी सर्वच पदे बिनविरोध निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी वसंत मोरे, उपाध्यक्षपदी कल्याण पचांगणे,व युवराज खोमणे, सचिव पदी चींतानामी शिरसागर, सहसचिव पदी गजानन हगवणे, तर खजिनदारपदी सुदाम नेवसे यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माणिकराव दांगडे, दत्ता माळशिकारे, गणेश आळंदीकर, अशोक वेदपाठक, संतोष शेंडकर, राजेंद्र गलांडे, अमोल यादव, अनिल धुमाळ, महेश जगताप, मनोहर तावरे, विजय गोलांडे, विनोद पवार, हेमंत गडकरी, सचिन वाघ, सोमनाथ लोणकर, अमर वाघ, यांच्यासह संघातील सर्व सदस्य उपस्थित होते.निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत मोरे म्हणाले की, येणाऱ्या काळात संघातील सर्व सदस्यांना एकत्र घेवून संघाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे तसेच पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी पोहोचवून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

أحدث أقدم