मोरगाव :  मोरगाव ता. बारामती येथे आज ओबीसी  आरक्षण कृती समीतीची  बैठक संपन्न झाली . यामध्ये 29 जुलै रोजी बारामती येथे  होणाऱ्या  एल्गार मोर्चाच्या  मेळाव्याचे नियोजनासाठी तालुक्यात सर्वत्र   घोंगडी बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरले. याबाबतची   माहिती जिल्हा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत  यांनी दिली .
आज मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वर  मंगल कार्यालयात अखिल भारतीय समता परिषद व ओबीसी समाज कृती समाजाची बैठक संपन्न झाली . यावेळी पुणे जिल्हा समता परिषद जिल्हाध्यक्ष अनिल  लडकत ,  जय मल्हार संघटनेचे महाराष्ट्र  सचिव गणपत आबा देवकाते  ,बापूराव सोनवलकर ,  मोरगावचे सरपंच निलेश केदारी , संपत टकले ,पांडुरंग गारडे , दत्ता लोणकर ,नाना नेवसे , सुनील ढोले  आदी उपस्थित होते .ओबीसी आरक्षण राज्यात रद्द झाले असल्याने समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे .या नाराजीचे रुपांतर एल्गार मोर्चामध्ये होणार आहे .आज झालेल्या बैठकीत राज्य सरकार व केंद्र सरकारने ईंपेरीयल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा , यांसह ओबीसीच्या विविध समस्याबाबत चर्चा झाली .तसेच बारामतीमध्ये होणाऱ्या मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत यांनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post