बारामती दर्पण टीम...
संदिप आढाव(प्रतिनिधी)

बारामती:  बारामती मधील जळोची स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. हा विधी उघड्यावरती केला जातो. पाऊस पडल्यावर मृतांवर पूर्णपणे अंत्यसंस्कार होणार नाहीत. या ठिकाणी अथवा इतर ठिकाणी पत्रा शेड उभारण्याची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट अमोल सातकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. अॅडव्होकेट अमोल सातकर यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसांपासून स्मशानभूमीची तजवीज करण्याची मागणी प्रशासनाकडे करत आलो असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.  ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन  केले जाईल असा इशारा अॅडव्होकेट अमोल सातकर यांनी दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم