बारामती दर्पण टीम
अहमदनगर (प्रतिनिधी-रोहन रंधवे): महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये उद्यापासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ही नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. नुकतंच अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका हळहळू वाढत आहे. या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी उद्यापासून नवीन नियमावली लागू केली जाणार आहे. नगर जिल्हा हा कारोना संसर्गाच्या तिसऱ्या लेवलमध्ये आहे. त्यानुसार उद्यापासून नवीन निर्बंध जिल्ह्यात लागू केले जाणार आहे.
दिवसभर जमावबंदी लागू
अहमदनगरमध्ये शनिवारी आणि रविवार मेडिकल दुकान वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तर इतर दिवशी सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहतील. मात्र यासाठी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय नगरमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू केली जाणार आहे. तर त्या आधी दिवसभर जमावबंदी लागू असेल.
सोमवारपासून नवे निर्बंध काय?
शनिवारी आणि रविवारी मेडिकल वगळता सर्व बंद राहणार
इतर दिवशी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत खुली
सायंकाळी 4 नंतर संचारबंदी लागू, त्या आधी दिवसभर जमावबंदी
विवाहासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 जण उपस्थितीत राहण्यास परवानगी
हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु
सार्वजनिक वाहतूक 100 टक्के सुरू
शनिवार व रविवार सर्व बंद
إرسال تعليق