को-हाळे बू(दि६)! : लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने गरीब कुटुंबांचे जगणे मुश्कील झाले आहे अशा परिस्थितीत गरीब कुटुंबांना किराणा कीटचे वाटप करत वडगांव पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे.आज कोऱ्हाळे बुद्रुक मधील ३ तर थोपटेवाडी गावातील ८ कुटुंबांना या किटचे वाटप वडगाव पोलिसांकडून करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने महाराष्ट्रात 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यानच्या काळात अनेक मोठे उद्योग बंद पडले असून हातावर पोट असलेल्या कुटुंबांना दोन वेळचे खाणे ही मुश्कील झाले आहे. कोऱ्हाळे बुद्रुक व थोपटेवाडी गावातील अशा गरीब कुटुंबाना मदतीची गरज असल्याची माहिती बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी व बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन वाघ यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना दिली होती. ही माहिती मिळताच आज लांडे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबांना घरपोच किराणा किटचे वाटप केले. यावेळी पोलीस हवलदार बाळासो पानसरे, सचिन वाघ, पोलीस पाटील नितीन थोपटे उपस्थित होते. किराणा किट वाटप केलेल्या महिलांनी ही पोलिसांचे आभार मानले
Post a Comment