बारामती  : सुपे ता . बारामती येथील एका १४ वर्षें वयाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार  केला असल्याची घटना आज घडली . पारधी समाजाच्या अजय  सुनील काळे या हे दुष्कृत्य केले असून वडगांव निंबाळकर पोलीसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे . 
बारामती तालुक्यातील सुपा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली .दि . ७ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही चौदा वर्षीय अल्पवयीन  मुलगी आपल्या   आईसह घरामध्ये झोपली असताना आरोपी  अजय सुनील काळे रा . सुपा ता . बारामती याने घरात प्रवेश करुन  सदर मुलीला दमदाटी देऊन  अत्याचार केला आहे . या घटनेमुळे सुपा परीसरात तिव्र असंतोष व्यक्त होत आहे .
याबाबतची तक्रार मुलीच्या आईने वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली असुन सदर आरोपी विरोधात भा.द.वि. कलम ३७६ (३) , कलम ५०६ , व बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधीनियमानुसार   गुन्हा दाखल केला आहे .सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई श्रीगणेश कवितके करीत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post