सचिन वाघ
बारामती: मनावर घेतलं तर सोशल मीडियातून कोणतीही गोष्ट शक्य होते. बारामतीसह तीन तालुक्यातील सदस्य असलेल्या "समाजसेवा" या व्हाट्सअप ग्रुप ने चार दिवसात कोविड सेंटर साठी सव्वालाख मदत गोळा करून एक आदर्श निर्माण केला आहे.समाजसेवा या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून कोविड सेंटर साठी बघता बघता सव्वा लाखाची मदत जमा झाली आहे. समाजसेवा व्हाट्सअप ग्रुप एरवी राजकीय चर्चेसाठी प्रसिद्ध असलेला ग्रुप मात्र नावाप्रमाणेच या ग्रुपने सव्वा लाखाची मदत कोविड सेंटरसाठी जमा करून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आदर्श घडवला आहे.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वांनाच बसला आहे. राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या कोरोना विरुद्धच्या लढ्या मध्ये आता सर्वसामान्य माणूसही उतरला आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने अनेक जण आपापल्या परीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटीशी मदत करत आहेत. कोण कोविड सेंटरला आर्थिक मदत करत आहे तर कोण कोरोना रुग्णांना दोन वेळचे जेवण देऊन मदत करत आहे, तर कोण आपला वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड सेंटरला वस्तू स्वरूपात मदत करत आहे. अशीच मदत करण्यासाठीं बारामतीच्या पश्चिम भागात "समाजसेवा" या नावाने सुरू असलेल्या व्हाट्सअप ग्रुपने सव्वा लाखांची मदत उभा केली आहे. बारामती व पुरंदर तालुक्यातील 9 कोविड सेंटरला ही मदत केली आहे. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून सव्वा लाख रुपये निधी गोळा करणारा हा राज्यातील एकमेव ग्रुप ठरला आहे.  2014  साली शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हा सरचिटणीस मदन भैय्या काकडे यांनी बारामती, पुरंदर, खंडाळा ,फलटण या चार तालुक्यातील शेती, कला, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना एकत्र करून या ग्रुपची स्थापना केली. तेव्हापासून या ग्रुपवर विविध विषयावर मुद्देसूद चर्चांच्या फैरी झडत आल्या आहेत. दोन दिवसापूर्वी या गृपवर अशाच राजकीय-चर्चा झडत असताना ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे यांनी आपल्या ग्रुप मार्फत कोविड सेंटरला मदत करण्याची संकल्पना मांडली आणि लागलीच ग्रुप ॲडमिनने ही या संकल्पनेला दुजोरा देत आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले. ही रक्कम ॲडमिन यांच्या अकाउंटला जमा करून परिसरातील कोविड सेंटरला मदत करण्याचे ठरले. मग काय विविध विषयांच्या चर्चेसाठी मोबाईलच्या कीपॅड वर फिरणारी बोटे फोन पे आणि गूगल पे वर फिरली आणि बघता बघता चार दिवसात सव्वा लाख रुपयांचा निधी गोळा झाला. आणि हा निधी वितरित करण्यासाठी ग्रुप मधील काही सदस्यांची कमिटी स्थापन करून
पुरंदर तालुक्यातील माळशिरस 11000, नायगाव 5000, खळद 10,000,नीरा 11000, वीर 11000, तर बारामती तालुक्यातील वानेवाडी 21000, मोरगाव 5000 ,सुपे 15000, निंबुत 11000 याप्रमाणे
जमा झालेली ही मदत बारामती व पुरंदर तालुक्यातील नऊ कोविड सेंटरला सुपूर्द करण्यात आली व शिल्लक रक्कम भविष्य निर्वाह निधी म्हणून ठेवण्यात आली. सद्या या व्हाट्सअप ग्रुप चे परिसरातून कौतुक होत असून समाजसेवा या ग्रुपचे आपण सदस्य असल्याचा अभिमान आता ग्रूप सदस्यांना वाटू लागला आहे.


समाजसेवा या ग्रुपचा ऍडमिन असल्याचा मला अभिमान आहे, ग्रुपवर नेहमी राजकीय चर्चेच्या फैरी झडत असतात. कोविड सेंटरच्या मदतीसाठी आवाहन करताच सर्व सदस्य मदतीसाठी धावून आले त्या सर्व सदस्यांचे आभार ,भविष्यातही ग्रुपच्या माध्यमातून अशीच समाजसेवा केली जाईल. कोरोना संपताच एका मेजवानीचे आयोजन करून ग्रुप सदस्यांचे नाते घट्ट करणार आहे.

                 मदन काकडे
                 ग्रुप ॲडमिन

आपल्या भागात लोकसहभागातून चालू केलेल्या कोविड सेंटरला मदत करण्यासाठी समाजसेवा व्हाट्सअप ग्रुपवर काही संवेदनशील लोकांनी कल्पना मांडली. सगळ्यांनीच ती उचलून धरली. फारसे कुणाच्या मागे लागावे लागले नाही. उस्फुर्तपणे रकमा जमा होत गेल्या. 25 हजारांच्या अपेक्षेने सुरवात केली पण प्रतिसाद एवढा जोरात होता की 61 हजार, 81 हजार, 1 लाख असे टार्गेट वाढवत नेले अखेर सव्वा लाख जमा झाले. त्यामुळे एक-दोन सेंटर साठी चाललेली धडपड नऊ सेंटर पर्यंत पोहचली

संतोष शेंडकर 
पत्रकार व ग्रुप कमिटी सदस्य

Post a Comment

أحدث أقدم