कोराळे बुद्रुक,- थोपटेवाडी ग्रामपंचायतीचे मासिक मीटिंग सोमवार दिनांक 12 एप्रिल रोजी बोलावण्यात आली होती. मात्र मागील जमाखर्च ग्राम विकास अधिकारी यांनी दिला नसल्याने या खर्चाला मंजुरी देण्यासाठी जमाखर्च लेखी स्वरुपात मिळावा व त्यानंतर मिटिंग घेण्यात यावी असा लेखी अर्ज सदस्यांनी दिला आहे. मात्र विरोधक गावात कुरघोडीचे राजकारण करत सदस्य हजर नसल्याने मीटिंग कॅन्सल झाली असल्याचे सांगत आहेत हे वृत्त धादांत खोटे असल्याचे गावचे उपसरपंच कल्याण गावडे यांनी   साप्ताहिक बारामती दर्पण शी बोलताना सांगितले.गावात कोणत्याही विकास कामाला विरोध करण्याचे काम ही मंडळी करत असून चुकीच्या माहितीवर कोणीही विश्वास न ठेवण्याचे आव्हान गावडे यांनी केले आहे. आम्ही गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून गावच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न व अन्य विकास कामे करून यातूनच विरोधकांना उत्तर देणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم