बारामती  :  कोरोना या  विषाणुजन्य आजाराचा वाढता फैलाव  व उद्या बुधवार दि ३१ रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी  होणारी संभाव्य गर्दी  लक्षात घेता  चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखालील अष्टविनायक  प्रथम तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर , थेऊर येथील चिंतामणी मंदिर , चिंचवडचे मोरया गोसावी समाधी स्थळ  बंद ठेवले जाणार आहे . याबाबतचा  आदेश बारामती व हवेली   प्रांताधिकारी यांकडून प्राप्त झाला असल्याची माहीती  चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
बारामती तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची    वाढती रुग्ण संख्या व उद्या  बुधवार दिनांक 31 रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी होणारी  संभाव्य गर्दी याचा विचार करता  प्रतीबंधात्मक  उपाय  योजनांच्या अनुषंगाने  प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी  मयुरेश्वर मंदिर बंद बाबतचा आदेश काढला आहे . आज दिनांक 30 रोजी हा आदेश चिंचवड देवस्थान ट्रस्ट प्राप्त झाला असून या आदेशाचे पालन करून  मयुरेश्वर मंदिर सर्व भाविकांना  दर्शनासाठी  बंद राहणार आहे याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन  विश्वस्त पवार यांनी केले आहे .
उद्या मंदिर परीसरात  गर्दी करु नये व प्रशासन , चिंचवड देवस्थान ट्रस्ट्ला सहकार्य करावे .  या बंद काळात श्रींच्या परंपरेने चालत आलेल्या पूजा-अर्चा , नैवद्य व इतर धार्मिक विधी हे संपन्न होणार आहे.  तर  गुरुवार दिनांक 1 एप्रिल रोजी सर्व भाविकांना पहाटे साडेपाच वाजल्यापासून  नेहमीप्रमाणे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे .

Post a Comment

أحدث أقدم