बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून नामनिर्देशन दाखल झालेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशन फॉर्म ची छाननी प्रशासकीय भवन येथे आज मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी करण्यात आली यामध्ये अनेक दिग्गजांचे फॉर्म अपात्र झाले असून यामध्ये भाजपचे दिलीप खैरे यांचाही फॉर्म अपात्र करण्यात आला आहे यावर खैरे यांनी हरकत घेतली असून याची सुनावणी आज दुपारी तीन वाजता बारामती प्रशासकीय भवन येथे प्रांत अधिकाऱ्यांसमोर होणार आहे. या सुनावणीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पाच वर्षात तीन वेळा ऊस कारखान्याला तुटून आला नसल्याने अनेकांचे अर्ज बाद झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم