मांजरी बु: मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी दिली.
स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री.नंदकुमार घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अभियांत्रिकी विद्याशाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जि.प.सदस्य दिलीप घुले, प्राचार्य डॉ.रितेश पाटील, प्रा.सतिश पाटील, प्रा.नीरजा जैन, प्रा.रहास साहू, प्रा.अजित देशपांडे, मदन वैद्य, प्रा.केतन डुंबरे, प्रा.विवेक भोसले, प्रा.लक्ष्मीकांत शिंदे उपस्थित होते.
إرسال تعليق