सुपे प्रतिनिधी(दि६)
.               बारामती तालुक्यातील सुपे येथील बस स्टॉप परिसरात असणाऱ्या चांदगुडे आर्केड बिल्डींग शेजारी  मोबाइल विक्रीचे व इलेक्ट्रील दुकानाचे शटर उचकटून  काचेच्या जाड दरवाजास दगडाचा साह्याने घाव घालुन फोडत पाच अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह सव्वा नऊ लाख  रुपये किमतीचे मोबाइल फोन , एक्ससरिज लंपास केले. दरम्यान चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून त्याआधारे तपास सुरू आहे.
येथील फिर्यादीनुसार बसस्टॉप शेजारी सुपे - चौफुला रोड लगत असणाऱ्या चांदगुडे बिल्डिंग शेजारी नवजीवन मोबाईल व इलेक्ट्रीकल या नावाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी सुमारास दुकानचे व्यवस्थापक यांनी दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे शटर अर्धवट उघडल्याचे दिसुन आले व काचेचा दरवाजा फोडलेला दिसला आत पाहणी केली असता दुकानातील मोबाइल जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती सुपे पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.चोरट्यांच्या सर्व हालचाली दुकानाच्या दारातील व आतील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाल्या आहेत. पाहाटे आलेल्या तीघांनी शटर उचलले व नंतर आणखी दोन तरुणाने दुकानाच्या आतमध्ये प्रवेश केला. यानंतर दुकानातील मोबाइल चोरट्याने पिशवी मध्ये भरले.  हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. दरम्यान चोरट्यांनी सीसी टीव्हिस कोणत्याही प्रकारची हानी केली नाही ही मोठी बाब आहे . तसेच सदर यानुसार चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी दुकानाची रेकी केली असावी किंवा चोरट्यास दुकानाची पूर्ण माहिती असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.सदर घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी भेट दिली असुन पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शेलार यांच्यासह पोलीस यंत्रना करीत आहे , घटनास्थळी फिंगर प्रिंन्ट पथकाने येऊन पाहीनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم