कोऱ्हाळे बुद्रुक(दि८)-  कोऱ्हाळे बुद्रुक गावामध्ये सरपंच पदासाठी सर्व वंचित असलेल्या घटकातील व्यक्तींना सरपंच पदासाठी संधी देणार असल्याची माहिती सुनील भगत यांनी दिली आहे. बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज नुकतीच झाली आहे. कोराळे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी आरक्षण सर्वसाधारण पडले आहे. सर्व साधारण आरक्षण असल्याने यामध्ये सर्व समाजातील व्यक्तींना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कोराळे बुद्रुक गावामध्ये आज पर्यंत जो समाज घटक सरपंच पदापासून वंचित राहिला आहे अशा समाजाला सरपंच पद देणार असल्याचे सिद्धेश्वर ग्राम विकास गाव पॅनलचे सर्वेसर्वा सुनील भगत यांनी सांगितले आहे. रामचंद्र बापू भगत यांच्या आशीर्वादाने व गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर ग्राम विकास गाव पॅनल विजयाची परंपरा कायम राखून गावच्या विकासासाठी तत्पर असेल असा विश्वासही यावेळी सुनील तात्या भगत यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم