बारामती/प्रतिनिधी :  
कार्यकाल संपल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानुसार बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांचा सहृदयी भावुक निरोप समारंभ संपन्न झाला. 
निरोप देताना पोलिसांनी डबडबलेल्या डोळ्यांनी भावनवश होत अण्णासाहेब घोलप यांचा निरोप घेतला. यावेळी बारामती ग्रामीण पोलिसांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अण्णासाहेब घोलप व प्रमोद पोरे यांना निरोप दिला. यावेळी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी मिळून एकत्रित केलेले कामकाज, मिळालेले सन्मानपूर्वक आदर,  मार्गदर्शन, यामुळे सर्व पोलीस यावेळी भावुक झाले.
यावेळी निरोप घेताना घोलप यांनी पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मला जो प्रेमाने निरोप दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. गेले वर्षभर आपण ज्या संग भावनेने काम केले. त्यामुळे वर्षभरात आलेली सर्व आव्हाने आपण सक्षमपणे पार पाडली.यापुढेही आपण आपल्या कामात झोकून द्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांची सासवड येथील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांची घोडेगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. घोलप यांच्या कारकिर्दीत गुन्हेशोध पथकाने परराज्यात जाऊन ठाण मांडून बसलेल्या अनेक गुन्हेगारांचा छडा लाऊन त्यांना जेरबंद केले होते. अनेक गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसवला होता.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते,  पोलीस हवालदार राजेंद्र शेंडगे, अविनाश गायकवाड,अनिल ओमासे, बाळासाहेब सोनवलकरदत्तात्रय कुंभार, भानुदास बंडगर,  रमेश साळुंके, पोलीस नाईक परीमल माणेर, महिला पोलीस अंमलदार आशा शिरतोडे, सायली काळंगे ,आशाराणी जाधव, यांच्यासह इतर महिला पोलीस उपस्थित होत्या.

Post a Comment

أحدث أقدم