बारामती  : पुणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, त्याअनुषंगाने बारामती तालुक्यातील सर्व गावा-गावांत महिला दक्षता समित्या स्थापन करून प्रभावीपणे राबवा असे आवाहन पुणे जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती पूजा पारगे यांनी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांना केले आहे. संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून आली. त्या पार्श्वभूमीवर यापुढे महिलांवर अत्याचार होऊ नये यासाठी पिडीत महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी प्रत्येक गावात महिला दक्षता समिती नेमण्याचे आवाहन सभापती पारगे यांनी केले.
 पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, जिल्हा परिषद कडून देण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे देखील आवाहन सभापती पारगे यांनी केले आहे. मंगळवार  (दि.०३ ) रोजी पंचायत समिती बारामती येथे सभापती पुजा पारगे व जिल्हा परिषद महिला बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी सदिच्छा  भेट दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील महिला व बाल विकास प्रकल्प विभागाचा आढावा घेतला. पुणे जिल्ह्यात पोषण आहाराचे फोटो अपलोड करण्यात बारामतीच्या बाल विकास प्रकल्प विभाचा प्रथम क्रमांक आला होता.याचा आढावा घेताना तालुक्यातील महिला व बाल विकास प्रकल्प विभागाच्या कामाचे समाधान व्यक्त करत कौतुकास्पद अभिनंदन केले. तसेच सर्व शासकीय योजनांची यावेळी त्यांनी पंचायत समिती सदस्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तालुक्यात अंगणवाडी केंद्रात जास्तीत जास्त परसबागा वाढवाव्यात असे आवाहन केले.
 यावेळी सभापती निताताई बारवकर व उपसभापती प्रदिप धापटे यांनी पूजा पारगे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे,रोहिणी तावरे, मीनाक्षी तावरे, माजी सभापती संजय भोसले,पंचायत समिती सदस्य भारत गावडे,, रोहित कोकरे, राहुल झारगड, राहुल भापकर, लिलाबाई गावडे, शारदा खराडे, मेनका मगर, निता फरांदे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, महिला व विकास प्रकल्प अधिकारी मिथुन नागमवाड, प्रकल्प दोन चे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक नवले,विस्तार अधिकारी पूनम मराठे आदी उपस्थित होते.
 
 

Post a Comment

أحدث أقدم