सिद्धेश्वर चौक येथे नव्याने उभारलेल्या फलकाचे सुनील तात्या भगत यांच्या हस्ते उद्घाटन
कोऱ्हाळे बुद्रुक(दि१३): निरा-बारामती मार्गावरील कठीण पूल येथील चौकाचे सिद्धेश्वर चौक असे नामकरण करण्यात आले आहे. नुकतेच या चौकात नव्याने उभा केलेल्या सिद्धेश्वर चौक नामक फलकाचे उद्घाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील तात्या भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहन भगत, सचिन वाघ,डॉक्टर केसकर, डॉक्टर माळशिकारे, सोमनाथ लोणकर, नामदेव माळशिकारे, सुनील माळशिकारे, हरिभाऊ वाघ, यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. राज्यमार्ग असलेल्या निरा-बारामती महामार्गावर येेेेेथील १० ते १२ गावाांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा चौक मानला जातो, भविष्यात या चौकाच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सुनील (तात्या)भगत यांनी सांगितले.
Post a Comment