बारामती (दि २५) :बारामतीत काल दिवसभरात कोरोनाचे 46 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 30 रुग्ण तर ग्रामीण भागातील 16 रुग्ण आहेत.
कालचे शासकीय एकूण rt-pcr नमुने 357 घेण्यात आले होते. यापैकी एकूण 16 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून,प्रतीक्षेत 59 आहेत तर  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05 आले आहेत.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 नमुन्यांपैकी 11पॉझिटिव्ह आले आहेत.  तसेच कालचे एकूण एंटीजन 146 नमुन्यांपैकी  एकूण 19 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.                 त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या  16+11+19=46 झाली आहे. आतापर्यंत बारामतीची एकूण रूग्णसंख्या4750 झाले असून           एकूण बरे झालेले रुग्ण 4362 आहेत तसेच आतापर्यंत एकूण 124 मृत्यू झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post