बारामती (दि २७) :बारामतीत काल दिवसभरात कोरोनाचे 41 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 23 रुग्ण तर ग्रामीण भागातील 18रुग्ण आहेत.
कालचे शासकीय एकूण rt-pcr नमुने 411 घेण्यात आले होते. यापैकी एकूण 09 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून,प्रतीक्षेत 178 आहेत तर इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 01 आले आहेत.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 26नमुन्यांपैकी 12पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच कालचे एकूण एंटीजन 88 नमुन्यांपैकी एकूण 20 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 9+12+20=41 झाली आहे. आतापर्यंत बारामतीची एकूण रूग्णसंख्या4836 झाले असून एकूण बरे झालेले रुग्ण 4418 आहेत तसेच आतापर्यंत एकूण 125मृत्यू झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
Post a Comment