मांजरी बुद्रुक(दि३): मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी भारत सरकारच्या वतीने “सतर्क भारत, समृद्ध भारत” या संकल्पनेअंतर्गत दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे असे निर्देशित करण्यात आले होते. महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र मोजे यांनी सर्वांना दक्षता अभियानाविषयी सचोटीची शपथ दिली. सर्वांनी विविध क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे व आपल्या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी व्यक्त केले.
              याप्रसंगी प्रा.सतिश पाटील, प्रा.दिपक पाटील, प्रा.निरजा जैन, प्रा.रहास साहू, प्रा.अजित देशपांडे, प्रा.केतन डुंबरे, प्रा.विवेक भोसले, प्रा.लक्ष्मीकांत शिंदे, मदन वैद्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र मोजे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post