बारामती: आज दिनांक 22. 10 .2020 पहाटे तीनच्या सुमारास वंजारवाडी, बारामती हद्दीमध्ये दोन अनोळखी इसम रिक्षांमधून संशयित रित्या फिरत असल्याची माहिती ग्राम संरक्षण यंत्रणा कडून प्राप्त झाली होती.सदरची माहिती प्राप्त होताच वंजारवाडी येथे जाऊन नमूद संशयित इसम नामे 1)राजू सजन गायकवाड वय 22 वर्षे रा आमराई बारामती 2)विजय अरुण गायकवाड वय 21 वर्षे रा आमराई बारामती यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्या कडील ऑटो रिक्षा क्रमांक एम एचं बी 20 54 मध्ये हे एक कासव मिळाले. सदर कासव बाबत चौकशी केली असता त्यांनी कासव विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.कासव जवळ बाळगणे , त्याची विक्री करणे हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमा 1972 नुसार गुन्हा असून कासवा पासून पैशाचा पाऊस पडतो या अंधश्रद्धेमुळे कासवांची लाखो रुपयांना तस्करी होते. सदर दोन्ही इसमांना तसेच त्यांच्या ताब्यातील कासव व ऑटोरिक्षा पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रमोद पोरे, हवलदार दत्तात्रय कुंभार , रमेश नागटिळक,पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, प्रशांत राऊत, मंगेश कांबळे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, निखिल जाधव, अबरार शेख यांनी केली
Post a Comment