को-हाळे बुद्रुक- ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुत अक्षय राजाराम गावडे आणि अदिश पांडुरंग काटवटे यांनी कोह्राळे बु. (तालुका बारामती) येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रत्येक्षीके दाखवून अधिक उत्पन्न कसे घेता येईल याचे मार्गदर्शन केले . त्याच प्रमाणे नवनवीन मोबाईल अँप्लिकेशनचा उपयोग शेतीकामासाठी कसा केला जाऊ शकतो हे दाखवले. यात माती परीक्षना साठी माती नमुना कसा घ्यायचा, बीज प्रक्रिया, जनावरांचे लसीकरण व त्यांची निगा कशी राखायाची, शेतमाल कसा साठवून ठेवायचा, भाजीपाला कसा साठवायचा आदी प्रात्यक्षिक करून दाखवले. सेंद्रिय शेतीचे फायदे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर अनेक पीक पद्धत आणि गवत नियोजन आणि उपायोजना त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या. यासाठी प्राचार्य खोब्रागडे, कार्यक्रम समन्वयक एस. एस. निंबाळकर, प्राध्यापक एस. शिंदे , एस. कंकाळ आणि के. गोसावी सर यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी कोरोना विषयक सर्व काळजी घेत ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सरपंच , ग्रामसेवक आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
को-हाळे बुद्रुक येथे कृषिदुताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन l. सा. बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment