सुपे प्रतिनिधी/ सचिन पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची लवकरात लवकर प्रकृती सुधारावी यासाठी आज सुपा येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व, ग्रामपंचायत सुपेच्या वतीने मोरगावच्या श्री मयूरेश्वरला साकडे घातले. यावेळी अभिषेक करून त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.
राज्यात गेले आठ महिने कोरोना च्या आजाराने अनेक जण त्रस्त आहेत. सर्वसामान्यांचे लॉक डाऊन आणि अन्य कारणामुळे मोठे हाल झाले. याच काळात राजकीय प्रतिनिधी व केंद्रीय मंत्री तसेच अभिनेते यांचाही आजाराने मृत्यू झालाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही नुकतीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारून लवकरच नव्याने लोकसेवेत दाखल व्हावेत अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. यासाठी सुपे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अष्टविनायकातील श्रीमयुरेश्वराला साकडे घातले.
याप्रसंगी सुपे गावच्या सरपंच स्वाती हिरवे व अनिल हिरवे यांनी मयुरेश्वरांची सपत्नीक पुजा प्रार्थना करून अजितदादा लवकर बरे व्हावे असे साकडे घातले आहे ,
यावेळी बारामती राष्ट्रवादी कॉग्रेस शिक्षक सेलचे अशोक लोणकर , युवा सामाजिक कार्यकर्ते अनिल हिरवे , युवा कार्यकर्ते अतुल खैरे, राष्ट्रवादी कॉग्रेस विद्यार्थी उपाध्यक्ष महेश चांदगुडे , राष्ट्रवादी पदवीधर प्रतिनिधी सुयश जगताप , सुपे ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य मल्हारी खैरे ,सुमन जगताप, मुनीर डफेदार , राजश्री धुमाळ,रेखा चांदगुडे , गणेश जाधव , युवा कार्यकर्ते शंकरमहाराज सकट ,तसेच राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने सोशल डिसटन्स नियमाचे पालन करत कार्यकर्ते उपस्थित होते. या साठी राष्ट्रवादी कॉग्रेस सुपे युवक वर्ग , ग्रामपंचायत सुपे व अनिल हिरवे मित्र परिवाराच्या मार्फत नियोजन करण्यात आले होते , मोरगाव येथील पुरोहित अभिषेक गोसावी यांनी हा धार्मिक पूजा विधि केला.
Post a Comment