सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव नजीक असलेल्या शेराची वाडी येथे धक्कादायक प्रकार घडला असून एका सावत्र बापाने नऊ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून घटना घडताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या घटनेतील नराधम आरोपी रंगनाथ चंद्रशेखर दाताळ मुळगाव ( बोकनगाव तालुका. जिल्हा लातूर)याच्या विरोधात बलात्कार, अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेतील कुटुंब मोरगाव नजीक शेरराचीवाडी या ठिकाणी राहते. मात्र पीडित मुलीची आई जेजुरी येथे भाडोत्री खोली घेऊन राहत आहे. या घटनेतील आरोपी मुलीच्या आईचा दुसरा पती आहे
ही घटना सहा ऑक्टोबर रोजी घडली आहे. दुपारी अकरा ते दोन च्या दरम्यान नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीचा नाक तोंड दाबून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. व या घटनेची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या सूचनेनुसार वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे व पोलीस हवालदार संजय मोहिते यांनी काही मिनिटातच आरोपी सावत्र बापाला अटक केली असून तालुक्यात या घटनेचा निषेध केला जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
إرسال تعليق