बारामती (प्रतिनिधी-संदिप आढाव)
प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने बलुतेदार अलुतेदार भटक्या विमुक्तांच्या विविध न्याय हक्काच्या मागणीसाठी परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वा. राज्यव्यापी न्याय व हक्क परिषद बारामती मधील निरा रोड ला असलेल्या अनुज गार्डन मंगल कार्यालय, शारदानगर, माळेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, प्रजा सुराज्य पक्षाचे अध्यक्ष दशरथ राऊत, गोरसेना बंजारा राष्ट्रीय अध्यक्ष सदेश चव्हाण, महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच बारा बलुतेदार महासंघाचे अकोला जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे, फकिरा दल महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष सतिश कसबे, दिनानाथ वाघमारे, प्रतापराव गुरव, चंद्रकांत गवळी, साहेबराव कुमावत, सदाशिव हिवलेकर, सतिश दरेकर, विशालभाई जाधव, विजय बिरारी, बारा बलुतेदार महासंघाच्या राज्य कार्यकारणी सदस्या सायुज्यता दोडके, भटक्या विमुक्तांसाठी काम करणाऱ्या महिला नेत्या डॉ. प्रियांका राठोड, पल्लवी रेणके इ. मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
बलुतेदार अलुतेदार भटक्या विमुक्तांच्या विविध न्याय हक्कासाठी राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ओबीसीनिहाय जात गणना करण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. महाज्योतीला भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. बलुतेदार अलुतेदार आणि भटक्या विमुक्तांसाठी आर्थिक विकास महामंडळांना संख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा. रोहिणी आयोगाची केंद्र सरकारने अंमलबजावणी करावी इत्यादी विषयां बाबत चर्चा व मार्गदर्शन तसेच बलुतेदार अलुतेदार आणि भटक्या विमुक्तांच्या पुढील दिशा ठरविण्यात येणार असून या राज्यव्यापी परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती प्रजा सुराज्य पक्षाचे अध्यक्ष दशरथ राऊत यांनी दिली आहे.
إرسال تعليق