.बारामती(दि९) बारामतीत सध्या कोरोनाचा आलेख खाली आलेला पाहिला मिळत आहे.काल बारामतीत दिवसभरात 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे. 
काल शासकीय (08/10/20) एकूण rt-pcr 144 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते . यापैकी एकूण पॉझिटिव्ह 08 तर प्रतीक्षेत 01 आहे.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01आला आहे.तसेच काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -04 पैकी पॉझिटिव्ह -00 आले आहेत. तसेच काल एकूण 67 एंटीजन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते . यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15 आले आहेत.  त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   08+15=23 झाले आहेत. यामध्ये   शहरातील 14 तर ग्रामीण भागातील 09 रुग्ण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या-3632 झाली असून एकूण 3086 रुग्ण बरे झालेले आहेत व         एकूण मृत्यू 97 झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post