कोऱ्हाळे बुद्रुक(दि१): बारामती तालुक्यात काल दिवसभरात कोरोनाचे 24 रुग्ण आढळून आले असून यामध्ये शहरातील 19 रुग्ण तर ग्रामीण भागातील 5 रुग्ण आहेत.
सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की सध्या कोरोना रूग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी सुद्धा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढत आहे तरी सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसींग पाळावे तसेच दुकानदारांनी सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व आपले शहर व तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
आतापर्यंत बारामतीची रुग्ण संख्या 4210 एवढी झाली असून 3940 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर मृत्यूचा एकूण आकडा 114 वर गेला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
Post a Comment