बारामती:(दि३) बारामतीमध्ये काल दिवसभरात घेतलेल्या स्वॅब पैकी ९८ जणांचे रीपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली आहे . आता कोरोना रुग्ण बारामतीत झपाट्याने वाढत असल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे.
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr 200 पैकी  77 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ,निगेटिव- 111, तर प्रतीक्षेत-4 आहेत. तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह 08  तसेच शासकीय एंटीजेन37 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह-09 तर निगेटिव्ह 28 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले 76 नमुन्यापैकी पॉझिटिव्ह 12 तर निगेटिव्ह 64 आले आहेत. एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत 98 रुग्ण आढळून आले आहेत . यामध्ये शहरातील 59 तर  ग्रामीण भागातील 39  रुग्ण आहेत.  एकूण बारामतीची रुग्णसंख्या 1109 झाली असून         बारामती एकूण मृत्यूची संख्या  44 झाली आहे.

Post a Comment

أحدث أقدم