पणदरे(दि.२) बारामती तालुक्यातील पणदरे येथे कृषीकन्येकडुन कार्यक्रम व औद्यागिक जोड अंतर्गत कृषिकंन्या कु. वैष्णवी राजेंद्र पिसाळ हिने शून्य ऊर्जा शीतगृह (zero energy cool chamber )या विषयावर प्रत्याक्षिक सादर केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना शीतगृहाबद्दल माहिती देण्यात आली. शीतगृहाची बांधणी, त्यामध्ये शेतमालाची साठवण आणि घ्यावयाची काळजी यावरती प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.कमी खर्चात होणाऱ्या या शीतगृहातील तापमन हे बाहेरील तापमानापेक्षा १० ते १५ °c ने कमी राहते. यामुळे यात शेतीमाल चांगला राहण्यास मदत होते. अशी माहिती शेतकरी बांधवांना देण्यात आली. यावेळी परिवारातील गणेश जगताप, राजेंद्र पिसाळ, निलेश जगताप, संजय जगताप, दिलीप पिसाळ, असे आदर्श शेतकरी तर हर्षल जगताप, विशाल धायगुडे, ऋषिकेश पिसाळ हे युवा शेतकरी उपस्थित होते.यासाठी तिला प्रा.डॉ. एस.डी. निंबाळकर , कार्यक्रम प्रमुख एम. टी. काळे, प्रा. ए.एस. नगरे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर प्रात्यक्षिक हे योग्य सामाजिक अंतर राखून शासन नियमाचे पालन करून सादर करण्यात आले.
पणदरे येथे कृषिकन्येकडून प्रात्यक्षिक सादर. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق