बारामती(दि१०)  बारामती तालुक्यात आज आणखी ११२ कोरोना रुग्णांची  वाढ झाली आहे.  बारामतीमध्ये जनता कर्फ्यू लावाला असतानासुद्धा कोरोनाची वाढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.काल एकूण rt-pcr  279 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यामध्ये पॉझिटिव्ह 60 व प्रतीक्षेत 82   आहेत. तसेच काल एकूण 129 एंटीजन   नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी  52 पॉझिटिव्ह आले आहेत.काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह 60 + 52 =112 रुग्ण झाले असून शहरातील 69 ग्रामीण भागातील  43 रुग्ण               आढळून आले आहेत तरी बारामतीची एकूण रूग्णसंख्या-1767  झाली असून   एकूण बरे झालेली रुग्ण संख्या 721झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم