बारामती(दि८) बारामतीमध्ये लॉकडाऊन काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर बारामती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दिनांक ०७ सप्टेंबर २०२० व दि.०८ सप्टेंबर २०२० रोजी जनता कर्फ्यु काळामध्ये बारामती शहर व ग्रामीण भागात रस्त्यावर विनाकारण फिरणारे ,मास्क न घालता फिरणारे तसेच मो.वाहन अधिनियम यांचे उल्लंघन करणारे लोकांवर पोलिसांनी 1007 केसेस करून 2लाख 32 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे.
तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती मार्फ़त पेन्सिल सर्कल, सिटी इन पॉइंट, सांगवी, माळेगाव या भागात प्रवासी/खाजगी वाहतुक- ३९ गुन्हे व माल वाहतुक-२ गुन्हे दाखल करून एकुण १२६००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या पुढील काऴातही अशीच कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी घरी रहावे व प्रशासनाला सहकार्य करावे.
असे आव्हाहन बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.
إرسال تعليق