को-हाळे बुद्रुक(दि:५) बारामती तालुका व शहर सोमवार दिनांक ७ सप्टेंबरपासून १४ दिवस पूर्ण लॉकडाऊन होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे किराणासह इतर दुकानात खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. बारामती तालुक्यातील को-हाळे बुद्रुकच्या किराणा बाजारपेठत दुकानदारांकडून सोशल डिस्टंन्सचा नियम पायदळी तुडवत किराणा विक्री केली जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्ससह नियमांचा पूर्ण फज्जा उडाला असल्याचे चित्र को-हाळे बुद्रुकच्या बाजारपेठेत सध्या पाहायला मिळत आहे.
बारामती शहर व ग्रामीण भागात कोरोनाने सध्या हाहाकार घातला आहे. गेल्या चार दिवसांपासून बारामतीमध्ये रोज जवळपास शंभरच्या पटीने कोरोना रुग्ण सापडत आहेत. ग्रामीण भागातही गावोगावी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवार ७ सप्टेंबरपासून तालुक्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे.त्यामुळे किराणासह इतर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सर्वच दुकानात मोठी गर्दी केली असून सोशल डिस्टन्स, सॅनिटायजर, मास्क याचा दुकानदारांसह नागरीकांना सुध्दा विसर पडला आहे.

إرسال تعليق