बारामती(दि५) बारामती शहरात गेल्या तीन चार दिवसांत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा भडका उडाला होता.जवळपास ४०० रुग्ण शहर तालुक्यात आढळले आहेत.या पार्श्वभुमीवर नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी १४ दिवसांचा जनता कर्फ्यू 
जाहिर करण्यात आला आहे.मात्र, हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी विरोध केला.त्यानंतर १४ दिवसांचा जनता कर्फ्यू  ७ दिवसांवर आणण्यात आला आहे.यामध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर कर्फ्यू  कमी करण्यात
येईल. मात्र, रुग्णसंख्या वाढल्यास १४ दिवसांचा कर्फ्यू  पुढे सुरुच राहणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले आहे . शुक्रवारी (दि. ४) बारामती
नगरपालिका प्रशासना कडून दि.७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर(१४दिवस) या कालावधी साठी जनता कयूं लागू होणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. अनेक लोकांच्या बंद बाबतीत मागणी स्वरुपाच्या सूचना आल्या मुळे हा बंद घेण्यात आल्याचे तावरे यांनी पत्रकार परिषदे मधे सांगितले.वास्तविक पाहता या निर्णया साठी अधिकारी वगार्ने सर्व प्रकारच्या व्यापारी वगार्चे व नागरीकां चे मत घेणे अपेक्षीत होते. कोरोना रुग्णा ची संख्या व परिस्थिती गंभीर असल्यामुळे प्रशासनास हा निर्णय घेणे जरूरी चे वाटत असले तरी, व्यापारी
व प्रातिनिधिक स्वरुपात नागरीकां बरोबर चर्चा होणे गरजेचे होते. कोरोना इतकीच गंभीर परिस्थिती व्यापारी व सामान्य नागरिक यांची आर्थिक बाबतीत झालेली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे .

Post a Comment

أحدث أقدم