बारामती (दि१) बारामतीत काल दिवसभरात 39 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 18 रुग्ण तर ग्रामीणमधील 21रुग्ण आहेत. दिनांक 29/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 55 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 04 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तसेच कालचे (30/09/20) एकूण rt-pcr 181नमुने घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह- 17 तर प्रतीक्षेत 00 आहेत.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. आहेत.    काल खाजगी प्रयोग शाळेमार्फत  तपासलेले एकूण rt-pcr-28 नमुन्यांपैकी  पॉझिटिव्ह -05 आहेत.   कालचे एकूण एंटीजन 86 नमुने घेण्यात आले होते . त्यापैकी पॉझिटिव्ह-13 आले आहेत.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  04+17+05+13=39. झाले आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या-3285  झाली आहे. व  एकूण बरे झालेले रुग्ण 2513 झाले असून  तसेच एकूण मृत्यू-- 82 झाले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .


Post a Comment

أحدث أقدم