रात्रीची प्रशासन व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची वडगावकडे धाव 
 
वडगाव निंबाळकर(दि१०) - प्रतिनिधी
काल रात्री झालेल्या प्रचंड पावसामुळे वडगाव निंबाळकर च्या ओढ्याला पूर आला असून शंभरहून अधिक घरात पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे.
    काल रात्री वाकी परिसरात मोठा पाऊस झाला. त्यामुळे वाकीच्या ओढ्याचा पुल पाण्याखाली गेला. बंधाऱ्याच्या बाजूची माती वाहून गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वडगावच्या दिशेने आले. मात्र वडगाव निंबाळकर येथे ओढ्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली होती. काही दिवसांपूर्वी ग्रामपचायतीमार्फत ही जलपर्णी काढण्यासाठी मोठा खर्च केला होता. मात्र ही जलपर्णी परत वाढली होती. त्यामुळे पाणी साचून राहिले. परिणामी ओढ्या शेजारील घरांत पाणी शिरले. शंभरहून अधिक घरात पाणी शिरल्याने त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात पाणी शिरले. केंद्राची संरक्षक भिंत देखील पडली. प्राथमिक शाळेत ही कंबरे पर्यंत पाणी शिरले. तर ग्रामपंचायत कार्यालयात ही पाणी शिरले होते. व्यायामशाळेची इमारत ही पडली. काहीच्या गाड्या पाण्यात बुडाल्या. 
     संभाव्य परिस्थिती लक्षात घेत बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, जलसंपदा विभागाचे उपअभियंता घोरपडे, राषट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर  वडगावचे माजी सरपंच सुनिल ढोले यांनी वडगाव निंबाळकर येथे धाव घेत तातडीच्या उपाययोजना केल्या त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 
  मागील काही दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाने वाकीचा तलाव 100% भरला असून चाऱ्याना व पोट चाऱ्याना पूर येण्याचा इशारा दिला होता. मात्र तो इशारा गांभीर्याने न घेतल्याने हा प्रकार ओढवला. 
    कालच्या पुरामुळे शंभर हून अधिक घरे बाधित झाली असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. आज सकाळपासून बारामती पंचायत समितीच्या सभापती  नीता बारवकर उपसभापती प्रदीप बापू धापटे तसेच गट विकास अधिकारी राहुल काळभोर हे या नुकसानग्रस्त  भागाची पाहणी करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post