बारामती(दि२६) बारामतीमध्ये काल दिवसभरात कारोनाचे 79 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 30 रुग्ण तर ग्रामीण भागातील 49 रुग्ण आहेत.
25/09/20 रोजी एकूण rt-pcr 194नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 62 तर प्रतीक्षेत 0 आहे. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06 आहे. कालचे एकूण एंटीजन 84 नमुने तपासणीसाठी घेतले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह-17 आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 62+17=79 झाले आहेत.यामध्ये शहरातील 30 तर ग्रामीण भागातील 49 रुग्ण आहेत.बारामतीची एकूण रूग्णसंख्या 3020 झाली आहे. तसेच एकूण बरे झालेले रुग्ण 2112 झाले आहेत व एकूण मृत्यू 73 झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले आहे .

Post a Comment