कोऱ्हाळे बु(दि:१२)- कोरोणा विषाणुच्या अनुशंगाने बारामती तालुक्यात जनता कर्फ्यु लागु केला असताना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ने जनता कर्फ्यु दि. ०७ / ० ९ / २०२० रोजी लागु केल्यापासुन अवैध दारू विक्रेत्यांवर १३ छापे टाकले असुन त्यामध्ये गावठी हातभटटीची दारू सह, देशी –विदेशी दारू जप्त करून एकुन १२६३३ रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सा. बारामती दर्पणशी बोलताना दिली. 

 त्यामध्ये अवैध दारू विक्रेते १ ) राहूल भिकु साळवे रा कोन्हाळे बु।।, २) भारती लक्ष्मण सोनवणे रा पणदरे, ३) कर्वेश चंदर भोसले रा गितानगर पणदरे, ४) प्रकाश चैनसिंग नवले रा निंबुत, ५) विश्वास रणजित राठोड रा सुपे मुळ रा राजेवाडी ता पुरंदर, ६) राजु मुबारक शेख, ७) बशिर मुबारक शेख रा कोहाळे बु।। ता बारामती, ८ ) मानिका विजय गायकवाड रा मोरगाव, ९ ) लिलाबाई बाबुराव गायकवाड रा मोरगाव, १० ) विवके अंकुश पाटोळे रा करंजे, ११ ) कांतीलील विठठल पोटे रा मानाजीनगर, १२ ) किरण ढिंगच्यांग शिंदे रा मानाजीनगर, १३ ) गोरख गुलाब खोमणे रा मुढाळे या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

      सदरची कारवाई मा. अपर पोलीस अधिक्षक सो मिलींद मोहिते सो बारामती उपविभाग, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायन शिरगावकर सो, तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक एस व्ही लांडे सो मार्गदर्शनाखाली पोसई श्रीगणेश कवितके, पोसई एस सी मुंडे सो, पोहवा फणसे, पोहवा पाटमास, पोहवा शेंडगे, पोहवा गायकवाड, पोहवा काळे, पोना कुलकर्णी, पोना धेंडे यांनी कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post