बारामती(दि२२) बारामतीमध्ये  काल दिवसभरात कोरोनाचे 82 रुग्ण आढळून आले आहेत.  काल काही अंशता बारामतीकरांना दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा हा आकडा वाढला आहे. जनता कर्फ्यू असून सुद्धा बारामतीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नव्हता. मात्र जनता कर्फ्यूच्या शेवटच्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा  खाली आला होता . सोमवारपासून बारामती सुरळीतपणे सकाळी नऊ ते रात्री सातपर्यंत सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत महत्त्वाच्या कामाला बाहेर पडावे व मास्क सॅनिटायजर चा वापर करावा शारीरिक अंतर ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.    

दिनांक 20/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 06 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. तसेच कालचे (21/09/20) एकूण 182 rt-pcr नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 41 तर प्रतीक्षेत 00 आहेत.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 06 आले आहेत. कालचे एकूण 144 एंटीजन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 41 आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 41+41=82 झाली आहे. यामध्ये शहरातील 33 तर ग्रामीण भागातील 49 रुग्ण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या 2717  झाली असून एकूण बरे झालेले रुग्ण 1505  झाले आहेत व एकूण मृत्यू 68 झाले असल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post