बारामती(दि४) : बारामती शहर व तालुका ७ सप्टेंबर पासून पुढील चौदा दिवस पूर्णतः बंद राहणार आहे.शहराच्या सर्व सीमा बंद राहणार असून कोणालाही शहरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.फक्त वैद्यकीय सेवा आणि दूध वाहतूक सुरू राहणार आहे.इतर सर्व प्रकारचे व्यवसाय व सर्व प्रकारच्या सेवा पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. बारामतीत कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत असल्याने हा निर्णय प्रशासनामार्फत घेण्यात आला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून शंभरच्या पटीने कोरोनाचे रुग्ण बारामतीत वाढत होते. ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने काही गावांनी स्वतःहून बंद पाळला होता. मात्र प्रशासनाने आता चौदा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला असल्याने बारामती तालुक्याच्या सर्व सीमा बंद राहणार आहेत.
७ सप्टेंबरपासून बारामती तालुका लॉकडाउन . सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق