बारामती(दि३०) बारामतीमध्ये काल दिवसभरात कोरोनाचे 35 रुग्ण आढळून आले आहेत तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणात तालुक्यातील तीन गावात 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
कालचे शासकीय (29/09/20) एकूण rt-pcr 178 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 22 तर प्रतीक्षेत 55 आहेत. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02 आले आहेत. तसेच काल एकूण एंटीजन 88 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13 आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 22+13=35 झाले आहेत. यामध्ये शहरातील15 तर ग्रामीण भागातील 20 रुग्ण आहेत.
तसेच "काल माझे कुटुंब माझी जबाबदारी" या उपक्रमांतर्गत निंबुत,होळ व सांगवी याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण 157 एंटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये होळ येथे 06, नींबुत येथे 05 व सांगवी येथे 16 असे एकूण 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या आता 3236 झालेली आहे. तसेचआत्तापर्यंत 79 मृत्यू झाले आहेत.
إرسال تعليق