बारामती(दि२३) बारामतीमध्ये काल दिवसभरात 70 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत . अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .
कालचे (22/09/20) एकूण rt-pcr 164नमुने घेण्यात आले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह 34 तर प्रतीक्षेत 05 आहेत. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01आला आहे. कालचे एकूण एंटीजन 126 नमुने तपासणीसाठी घेतले होते यापैकी एकूण पॉझिटिव्ह-36 आले आहेत. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 34+36=70 झाली आहे यामध्ये शहरातील 30 तर ग्रामीण 40 रुग्ण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या-2787 झाली असून आत्तापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण 1707 झाले आहेत.तसेच एकूण मृत्यू 69 झाले आहेत.
Post a Comment