बारामती(दि१८) बारामतीमध्ये कोरोना रुग्ण संख्येने  आजही शंभरी पार केली आहे. आज बारामतीमध्ये  107 रूग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह  आले आहेत.मागील पंधरा दिवसांपूर्वी बारामतीमध्ये शंभराच्या पटीत रुग्ण सापडत होते.त्यामुळे प्रशासनाने बारामतीमध्ये जनता कर्फ्यू लागू केला होता याचा परिणाम थोडा फार पहायला मिळाला.  त्यामुळे प्रशासनाने सात दिवसांचा जनता कर्फ्यू चौदा दिवसांवर वाढवला आहे. 
दिनांक 16/9/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 11 नमुन्यांपैकी एकूण  08 नमुने पॉझिटिव आलेले आहेत.तसेच कालचे (17/09/20) एकूण rt-pcr नमुने 217 घेतले होते.यापैकी एकूण पॉझिटिव्ह 72 प्रतीक्षेत 11 आहेत. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05 आले आहेत. कालचे एकूण 112एंटीजन नमुने घेण्यात आले होते. यापैकी एकूण पॉझिटिव्ह 27 आले आहेत.     काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 08+72+27=107 झाली आहे. यामध्ये शहरातील 53 ग्रामीण भागातील 54  रुग्ण आहेत.यामुळे बारामतीची  एकूण रूग्णसंख्या-2492 झाली आहे व      एकूण बरे झालेले रुग्ण संख्या 1230  झाली आहे.        आत्तापर्यंत बारामतीत एकूण मृत्यू 60 झाले असल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post