को-हाळे बुद्रुक(दि११) बारामती तालुक्यात जनता कर्फ्यू  असताना सुध्दा काही नागरीक विनाकारण  रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे आज वडगाव निंबाळकर पोलिसांनी कठीन पूल व बजरंगवाडी या ठिकाणी  वाहनचालकांवर कारवाई करत तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे .वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वाहतुक पोलिसांकडून कटिंग पुल व बजरंग वाडी चौक येथे 15 वाहनचालकांवर कारवाई करून तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस जमादार जाधव, वाहतूक पोलीस कर्मचारी बाळासो पानसरे, पो. कर्मचारी अक्षय सिताप ,अमोल भुजबळ होमगार्ड हनुमंत जाधव यांनी केली आहे. तसेच नागरीकांनी विनाकारण बाहेर न पडता सर्वांनी काळजी घेण्याचे आव्हान पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post